जळगाव । जळगावमधील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील वय-२७ या तरुणाची दोघांनी निर्घृण हत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली असून या खुन्यातील संशयित आरोपीच्या जळगाव एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहेत. योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु वय-२७ रा.कासमवाडी जळगाव, असं अटक केलेल्याचे नाव आहे.
या घटनेबाबत असे की, कासमवाडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर पाटील या तरुणाचे आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी किरकोळ वाद होते. दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील हा घराजवळील एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने त्याच्या पोटावर, मांडीवर वार केले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ७०६/२०२५ बी.एन.एस कायदा कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांच्या शोधासाठी तत्काळ पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने काही तासांतच गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटु यांस शिताफिने नशिराबाद परीसरातुन ताब्यात घेतले. आरोपीस पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.















Discussion about this post