नवी दिल्ली । संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपावली आहे. सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार असून यात चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे.
परदेशात व्यापार कराराबाबत संसदीय मैत्री समितीमध्ये महाराष्ट्रातून विरोधी गटातील खासदार सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली. याआधीही सुप्रिया सुळे यांची निवड ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात करण्यात आली होती. या शिष्टमंडळाला जगभरात पाठवण्यात आलं होतं. ज्यात विरोधी गटातून खासदार सुप्रिया सुळे यांचा सहभाग होता.
याआधी सुप्रिया सुळे यांनी संसदेत माहिती तंत्रज्ञान, गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर काम केलं आहे. वेगवेळ्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी आणि धोरणात्मक चर्चेसाठी स्थापन होणाऱ्या संसदीय मैत्री गटांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ६४ देशांसोबत संसदीय मैत्री गटांची स्थापना केली. त्यापैकी सुप्रिया सुळे यांच्याश काही गटांचे नेतृत्व वरिष्ठ विरोधी पक्षनेत्यांकडे सोपवले आहे.















Discussion about this post