नवी दिल्ली । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. मे महिन्यात कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला होता. ओबीसींसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून या निवडणुका रखडल्या होत्या. आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आणि आणि ३१ जानेवारी २०२६ च्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकारला विचारले की,’निवडणुका झाल्या आहेत का? मे महिन्यामध्ये आदेश दिला होता. चार महिन्यांत (सप्टेंबर अखेरीस) निवडणुका होणे अपेक्षित होतेया सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला झापले. त्यानंतर कोर्टाने मुदतवाढ करत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या असे सांगितले. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समितींच्या रखडलेल्या निवडणुका जानेवारीच्या ३१ तारखेपूर्वी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला निवडणुकांची तयारी वेगाने करावी लागेल आणि कोर्टाला निवडणुका कधी घेणार याची तारीख सांगावी लागेल.















Discussion about this post