जळगाव । भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या बुधवारी (ता.२९) ला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते जळगाव व रावेर लोकसभा क्षेत्रात दौरा करणार आहेत. ‘घर चलो अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ते ‘सुपर वॉरिअर्स यांच्यांशी चर्चा करणार आहेत.
बुधवारी (ता.२९) सकाळी चाळीसगाव, पाचोरा व पारोळा भडगाव तर दुपारी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा क्षेत्रात ते प्रचार फेरी काढणार आहेत. गुरुवारी (ता.३०) रावेर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात फिरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.















Discussion about this post