महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रवाशांच्या दळणवळणाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया कधी राबवली जाणार, याची उत्सुकता लागली होती. आता ही उत्सुकता संपलेली आहे. कारण एसटीमध्ये तब्बल 17 हजार 450 जागांची भरती केली जाणार आहे.
चालक आणि सहायक पदांसाठी ही कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. भविष्यात येणाऱ्या 8 हजार नवीन एसटी बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने ही भरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, ‘येत्या 2 ऑक्टोबर या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना 30 हजार रुपये इतके किमान वेतन दिलं जाणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत बससेवा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्षांच्या कालवधीसाठी घेण्याबाबतची ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही ई-निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभांगमध्ये राबवली जाणार आहे. तर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार इतके किमान वेतन दिले जाईल आणि त्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.















Discussion about this post