परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. त्यात त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. आयोगानेही त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनिय अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा १५ डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा अहवालातून समोर आली आहे.
‘परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती.’, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालामध्ये काढण्यात आला आहे. तसंच त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तब्बल ४५१ पानांचा गोपनीय अहवाल तयार केला असून हा अहवाल आता राज्य मानवाधिकार आयोगापुढे सादर करण्यात आला आहे.
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर राज्यातील वातावरण तापले होते. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. सोमनाथ यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राज्यभर आंदोलनं करण्यात आली होती. पोलिसांनी सोमनाथ यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचे सांगितले होते. रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
Discussion about this post