मुंबई । जर तुम्ही नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात असाल तर हा नियम तुमच्यासाठी महत्वाचा आहे. सिम कार्डविषयीचा हा नियम 1 डिसेंबर 2023 रोजीपासून म्हणजे शुक्रवारपासून लागू होत आहे.
वाढत्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम लागू करण्यात येत आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका ओळखपत्रावर सिम खरेदीला बंधन येतील. अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई प्रस्तावित आहे.
हे नवीन नियम 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात लागू होतील. त्यामुळे बोगस सिमकार्ड आधारे करण्यात येणाऱ्या घोटाळ्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि तुरुंगाची तरतूद आहे.
असा होईल बदल
सिम डीलर व्हेरिफिकेशन – सिम कार्ड डीलरसाठी नियमात कडक तरतूद करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना डीलरचे व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना एजन्सी देता येणार नाही. त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन, पडताळा अनिवार्य करण्यात आला आहे. नाहीतर टेलिकॉम कंपनीला 10 लाख रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
आधार कार्डची प्रत – ज्या ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करायचे आहे. त्यांना आधार कार्डशिवाय सिम कार्ड खरेदी करता येणार नाही. इतर कोणाच्या आधारचा वापर केल्याचे आढळल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे
सिम कार्डची मर्यादा – नवीन नियमांनी किती सिमकार्ड असावेत याची मर्यादा स्पष्ट केली आहे. व्यावसायिक वापरासाठी घाऊक सिम कार्ड खरेदीबाबत नवीन नियम आला आहे. तर एका ओळखपत्रावर वैयक्तिक वापरकर्त्याला 9 सिम कार्ड खरेदी करता येतील.
डीएक्टिव्हसाठी कालावधी –तुमचे सिमकार्ड तुम्ही बंद केले. ते डिएक्टिव्ह झाल्यावर 90 दिवसांचा वेटिंग पिरियड असेल. तीन महिन्यानंतर हा क्रमांक इतर व्यक्तीला देता येईल.















Discussion about this post