मुंबई । आज, २२ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र सुरू होत आहे. आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. आज १ तोळा सोनं ४३० रुपयांनी महागले. तर १ किलो चांदी ३००० रुपयांनी महागली. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या…
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,५८० रुपये मोजावे लागणार आहेत.आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाल १,०३,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.
त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८४,४४० रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १३८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,३८,००० रुपये खर्च करावे लागतील.















Discussion about this post