जळगाव : विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या सुभाषवाडी (ता. जळगाव) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पवन भिका जाधव (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पवन जाधव हा मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शनिवारी सकाळी उठल्यावर तो नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडला व गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे त्याला पोहण्याचा मोह झाल्याने तो, विहिरीत उतरला. मात्र, पोहताना तळाशी जावून बुडाला. हि घटना गावातील काहींनी पहिली होती. यामुळे बातमी गावात समजली.
याबाबत ग्रामस्थांना कळताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवनच्या मागे आई-वडील, २ भाऊ, २ विवाहित बहीणी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post