मुंबई । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने अनेक नेते जागा वाटपाबाबत परस्पर भाष्य करत असून काही नेते तर किती जागा पाहिजे याचा आकडाच सांगत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.आता अशातच शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी महायुतीत जास्त जागांची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे हेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचं नेतृत्व करत असल्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे. आम्हाला जास्त जागा नाही मिळाल्या तर किमान समान जागा तरी मिळाव्यात एवढी आमची मागणी असणार आहे, असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
जागा वाटपाचा निर्णय शेवटी नेते घेतील. मी निर्णय घेणार नाही. पण पक्षाचा एक शिपाई म्हणून आम्हाला सर्वाधिक जागा मिळाव्यात ही माझी भावना आहे. जास्तीत जास्त जागा मिळाल्याच पाहिजे. आता राज्यात एकट्याच्या बळावर सरकार येऊ शकत नाही. स्वबळावर सत्ता येणं हे इतिहासजमा झालं आहे, असं अर्जुन खोतकर म्हणाले.
Discussion about this post