शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. ‘अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही असा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच, ‘हे सरकार मोदींचं नसून एनडीएचेच आहे.’, असा देखील टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. ‘राज्यात महायुतीकडे 7 मुख्यमंत्री आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा पाय कापून कसं मुख्यमंत्री बनवता येईल असा प्रयत्न सुरू आहे.
अमित शाह यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. ते कोअर कमिटीच्या बैठकीत सांगत आहेत भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे. पण अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस नाहीत. भावी मुख्यमंत्री (तिन्ही पक्षाचे) एकमेकांचे पाय खेचणार करणार आहेत. एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत.’, असे मत राऊतांनी व्यक्त केले.















Discussion about this post