जळगाव : देशातील विविध भागांतून शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या तसेच राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 1 फेब्रुवारीपर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित करण्यात आली मात्र आता ती 1 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी अधिसूचित 31 जानेवारीपर्यंत धावणार होती मात्र ती आता 28 फेब्रुवारीपर्यंत धावेल.
या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
वरील विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.















Discussion about this post