जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणुकीसाठीचे पहिले पाऊल टाकले असून महत्त्वाच्या महापालिकांसाठी निवडणूक प्रभारीपदाच्या नेमणुका केल्या आहेत. यामध्ये भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर शरद पवार गटाने मनपा प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील २९ मनपातील प्रभारींची घोषणा केली. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने महापालिकांची जबाबदारी दिली आहे.
तर जळगाव मनपाची जबाबदारी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर सोपविली आहे. भुसावळ पालिकेत शरद पवार गटाचे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली.त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून मनपात उमेदवार विजयासाठी आवश्यक कार्यपद्धतीची अंमलबजावाणी आता चौधरींच्या माध्यमातून होणार आहे. जळगाव शहराचा बराच भाग पूर्वी भुसावळ विधानसभा मतदारसंघात होता. त्यामुळे चौधरींना शहराची ओळख असल्याने उमेदवार निश्चित करताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. गेल्या आठवड्यात त्यांनी मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांना बघून घेऊ असे खळबळजनक विधान केले होते.
निवडणूक प्रभारींची यादी
बृहन्मुंबई – आमदार रोहितदादा पवार
ठाणे – आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई – आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश अध्यक्ष
उल्हासनगर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
कल्याण डोंबिवली – खासदार बाळयामामा म्हात्रे
भिवंडी निजामपूर – . खासदार बाळयामामा म्हात्रे
मीरा भाईंदर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
नाशिक – सुनिल भुसारा
मालेगाव – खासदार भास्कर भगरे
अहिल्यानगर – खासदार निलेश लंके
जळगाव – संतोष चौधरी
धुळे – प्राजक्त तनपुरे
पुणे – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा
पिंपरी चिंचवड – खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार
सोलापूर – खासदार धैर्यशील पाटील
कोल्हापूर – हर्षवर्धन पाटील
इचलकरंजी – बाळासाहेब पाटील
सांगली – मिरज – कुपवाड – आमदार जयंत पाटील
छत्रपती संभाजीनगर – खासदार बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा – जयप्रकाश दांडेगावकर
परभणी – फौजिया खान
जालना – राजेश टोपे
लातूर – विनायक जाधव पाटील
अमरावती – रमेश बंग
अकोला – डॉ. राजेंद्र शिंगणे
नागपूर – अनिल देशमुख
चंद्रपूर – खासदार अमर काळे















Discussion about this post