मुंबई । वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफवर हल्ला करण्यात आला आहे. यात त्याच्या मानेला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या असून सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सर्जरी सुरू आहे.
वांद्रे येथील ३ बीएचके या अलिशन घरात सैफ अली खान होता, त्यावेळी मध्यरात्री चोर घुसले. यावेळी सैफ अली खान आणि चोरामध्ये मध्यरात्री अडीच वाजता झटापट झाली. चोराने सैफ अली खान याच्यावर सपासप चाकूने वार केला. सैफ अली खान याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराकडून वार करण्यात आले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया झाल्याचे समजतेय.
सर्जरी करून सैफच्या पाठीतलं शस्त्र काढण्यात आलेय. त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिकृत मीडिया टीमकडून देण्यात आली आहे. सैफ अली खान याच्याकडून चाहत्यांना संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आलेय.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याती प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या शोधासाठी, अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहे.















Discussion about this post