जळगाव । वाढत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी शाळांच्या वेळेत बदल केला आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक शाळांची वेळ १ मार्चपासून सकाळी ७ ते दुपारी १२.३० अशी करण्यात आली आहे. तसे आदेश सीईओंनी दिले आहेत,
एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२.३० अशी असणार आहे. शिवाय बाजाराच्या दिवशी शाळांची वेळ सकाळी ७ ते १०,३० पर्यंत राहील. शाळांची मधली सुटीची वेळ ३० मिनिटांची निश्चित करण्यात आली आहे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार तासिकात बदल नाही.















Discussion about this post