सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवार ५ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यामुळे, सर्व उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) VP वेल्थ (SRM) – 506 पदे
2) AVP वेल्थ (RM) – 206 पदे
3) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव – 284 पदे
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: पदवीधर
र्ज कसा करावा?
उमेदवार येथे दिलेल्या चरणांचे अनुसरण करून अर्ज करू शकतात.
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर विभागावर क्लिक करा.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, एसबीआय एससीओ नोंदणी लिंकवर क्लिक करा.
तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर, विहित परीक्षा शुल्क भरा.
शेवटी, अर्ज शुल्काची प्रिंटआउट घ्या.
अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹७५० आहे. शिवाय, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.















Discussion about this post