मुंबई । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केला आणि महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. आज त्याच फोटोवर संजय राऊतांनी नवा ट्विट केला आहे आणि भाजपनं फोटोवर दिलेल्या कबुलीची राऊतांनी खिल्ली उडवली. एका हिंदी म्हणीच्या आधारे त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. माझ्या ट्विटला भाजपने उत्तर देणं हे ‘आ बैल, मुझे मार!’, असं असल्याचं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत म्हणाले, माझ्या ट्विटमध्ये मी कुणाचं नाव घेतलं का, कुणाच्या विरोधात आरोप केले का? नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की, महाराष्ट्र जळत असताना एक महाशय मकाऊमधे जुगार खेळतायत मात्र भाजप हिट विकेट झालं.. स्वतःच जाहीर केलं ही फोटोतले महाशय त्यांचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत.
Did I name or made allegations against anyone in my tweet ? NO !
All I said in my simple Tweet was that 'some Nero is busy gambling in Macau (China) as Maharashtra burns…'
But the BJP threw a hit wicket and went on to announunce that the person in picture is 'their' State… pic.twitter.com/Ni6oaqt2Tf
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2023
संजय राऊतांनी हा फोटो ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केलाय.राऊतांच्या मते, हा फोटो मकाऊमधला आहे. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमधल्या कॅसिनो जुगारात बावनकुळेंनी साधारण साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा दावा राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी बावनकुळेंवर असे गंभीर आरोप केल्यानंतर बावनकुळेंनीही ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय.