मुंबई । महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी आणि काँग्रेस पक्षानेही सोबत यावे, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. तरीही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढल्या गेल्या पाहिजेत, यासाठी संजय राऊत यांनी आज राहुल गांधी यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.
संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मविआ म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. यावर काँग्रेस काय निर्णय घेते ते पाहावं लागेल. मुंबईतील 227 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई महापालिकेत भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी मविआ एकत्र राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.















Discussion about this post