जळगाव । नरेंद मोदी गुजरात दंगलीतील संशयित असताना त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यातून बाहेर काढले होते. अमीत शहा संशयित असताना शरद पवार यांनी त्यांना बाहेर काढले, असा दावा संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. तसेच संजय राऊतांनी शिंदेंची शिवसेना ‘लोफरांची’ आहे, असा आरोपही केला आहे? त्यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “संजय राऊत महालोफर आहे. कावळ्याचे बसणं आणि फांदीचं तुटणं अशातचा हा प्रकार आहे. ते ठाकरे गटात एकटेच असल्याने तेच बोलत असतात.,”
तसेच ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केलेल्या दाव्या पालकमंत्री पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. राऊत त्यावेळी संपादक होते, मध्यस्थी नव्हते. त्यांना भाजप-शिवसेनेमध्ये काय चालले आहे, याची कल्पना नव्हती. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, आम्ही कार्यकर्ते आजही जिवंत आहोत, पवारांविषयी मला माहीत नाही,असे गुलाबराव पाटील म्हणाले.
संजय राऊत त्यावेळी काय मध्यस्थ नव्हते, की त्यांनी त्यावेळी सर्व गोष्टी पाहिल्या. एवढ्या मोठ्या लोकांवर त्या माणसाने बोलनं मला उचित वाटत नाही. मोदी साहेबांच्या मनात बाळासाहेबांबद्दल कायमच आदराचं स्थान आहे. कायम राहणार आहे. आजही कोणी म्हणत असेल, बाळासाहेबांची शिवसेना संपली तर निश्चितच नाही. कारण आम्ही त्यांचे शिवसैनिक आजही जिवंत आहोत, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post