धरणगाव । राज्यात निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांच्या भाषणांनी रंगत चढली असून खुसखुशीत आणि जहरी शब्दांनी एकमेकांवर आसूड ओढण्यात येत आहे. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खुलं चॅलेंज दिलं. तसेच सुषमा अधांरे यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
40 रेडे फुटून गेले म्हणणारा माणूस संजय राऊत याला माझे चॅलेंज आहे. तेरा पैलवान मेरे सामने उतार दे, असे आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनाच आपल्या समोर मैदानात उतरवा असे आव्हान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील दोन्ही गोटात धुमश्चक्री उडणार हे पक्कं आहे.
सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
सुषमा अंधारे बोलून गेल्या होत्या की या रेड्याला आम्ही कापणार आहोत तो रेडा आता तयार आहे.तुझ्याकडे कापण्याला कोणी माणूस तलवार घेऊन उभा आहे का याची तलाश हा गुलाबराव पाटील करतो आहे, असा उपरोधिक टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.
शरद पवारांवर टीका करण्याऐवढी मी मोठा नाही
शरद पवार यांच्यावर टीका करू नका. कारण आपली तेवढी लायकी नाही. शरद पवार यांच्यावर टीका करणे एवढा मोठा माणूस मी झालेला नाही. संजय राऊत, वो अपना माल है. उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर मी कधीच टीका करत नाही कारण टीका करण्याएवढी आपली लायकी नाही. कार्यकर्त्यांनी मर्यादा ओळखून व जपून बोलण्याचाही सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला
Discussion about this post