मुंबई । प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरच्या ऑनलाईन गेमिंग जाहिरातीविरोधात आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणात आता बच्चू कडूंनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन तेंडूलकर करत असलेल्या ऑनलाईन जाहिरातीवरुन बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडूलकर करत असलेल्या जाहिरातींबाबत स्पष्टिकरण द्यावे अन्यथा त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
तसेच बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिन तेंडूलकर हे भारतरत्न आहेत, त्यांनी अशा जाहिराती करु नयेत ही आमची विनंती आहे. अन्यथा त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
भारतीयांची ऑनलाईन गेमपासून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. नारळ देऊ. त्यांना नारळ देऊन त्यातून बाहेर निघण्याची विनंती करू. आमचं आंदोलन नेहमी अनोखं असतं. यावेळीही तसेच असेल. आम्ही सचिन तेंडुलकर यांना नारळपान देण्याचं आंदोलन करणार आहोत. लोकं सुपारी घेतात, तुम्ही नारळ घ्या. जाहिरातच नाही तर ऑनलाईन गेमच हद्दपार करा, अशी विनंती सचिन यांना करू, असं बच्चू कडू म्हणाले.
Discussion about this post