जळगाव | जागतिक महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशनच्या वतीने सन्मान स्त्रीशक्तीचा या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला.हॉटेल आयव्हरी टस्क येथे आज ७ मार्च रोजी झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत स्त्रीशक्तीचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ, गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, आयएमएच्या सचिव डॉ. अनिता भोळे, जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त सौ. निर्मला गायकवाड, सौ. धनश्री शिंदे, सौ. अश्विनी गायकवाड, डॉ. आरती शिलाहार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात “विवाह पलिकडील सत्य ” या महिलांवर आधारित ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका सौ. भारती कुमावत लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. “या पुस्तकाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असून, जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर त्याचे प्रकाशन होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे लेखिका कुमावत यांनी यावेळी सांगितले .
स्त्रीशक्तीचा गौरव म्हणजे समाजाचा विकास!
एस.डी. फाऊंडेशनच्या “सेवा मे स्वर्ग “या ब्रीद वाक्यानुसार समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांचा योग्य सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सचिव सुहास दुसाने यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एस.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने, उपाध्यक्ष छोटू पाटील, सौ. भाग्यश्री दुसाने, सौ. रोहिणी विसपुते, सौ. जयश्री बऱ्हाटे, चेतन दुसाने, संतोष आहुजा, जतिन इंगळे, प्रभुदत्त दुसाने व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला!
Discussion about this post