नाशिक । नाशिकमधील भोंदू ज्योतिष अशोक खरात याला बलात्कार प्रकरणात करण्यात आली असून त्याचे अनेक काळे कारनामे उजेडात आले आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही खरातसोबतचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ आले आहे. यावरून चाकणकर यांच्यावर टीकेचा भडिमार केला जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भोंदु बाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याच प्रमाणे या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत, त्यावर आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून योग्य कार्यवाही करणार आहे आणि ते येणाऱ्या काळात दिसेल.” असी मोठी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. पटेलांनी या विधानातून रुपाली चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
चाकणकरांची नार्को टेस्ट करावी
रुपाली चाकणकरांचे फोटो दाखवत उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारेंनी चाकणकरांचा राजीनामा घेऊन त्यांची नार्के टेस्ट करावी अशी मोठी मागणी केली आहे. तसेच त्यांना या गुन्ह्याची माहिती आधीपासून होती, असा मोठा दावाही केला आहे.















Discussion about this post