रेल्वे भरती मंडळाने सहाय्यक लोको पायलट भरती २०२५ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ९,९७० पदांसाठी भरती केली जाईल. आरआरबीने जारी केलेल्या छोट्या अधिसूचनेनुसार, अर्ज सुरू होण्याची संभाव्य तारीख १० एप्रिल आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२५ आहे. अर्ज आरआरबीच्या अधिकृत वेबसाइट, rrbcdg.gov.in ला भेट देऊन करावा लागेल.
आरआरबी लवकरच सविस्तर अधिसूचना जारी करेल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आणि वयोमर्यादा काय असावी आणि या पदांसाठी अर्जदारांची निवड कशी केली जाईल ते जाणून घेऊया..
काय आहे पात्रता?
आरआरबी असिस्टंट लोको पायलट भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे आयटीआय प्रमाणपत्र किंवा अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
RRB ची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in ला भेट द्या.
येथे असिस्टंट लोको पायलट भरती २०२५ अधिसूचना लिंकवर क्लिक करा.
आता अप्लाय लिंकवर क्लिक करा.
फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.
निवड कशी केली जाईल?
असिस्टंट लोको पायलट भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड सीबीटी १, सीबीटी २ परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. सीबीटी १ परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार सीबीटी परीक्षेत बसतील. सीबीटी १ परीक्षेत गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य विज्ञान आणि सामान्य जागरूकता विषयांमधून एकूण ७५ प्रश्न विचारले जातील. सीबीटी २ परीक्षेत तांत्रिक ज्ञान आणि सामान्य विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. रेल्वे भरती मंडळ लवकरच सविस्तर अधिसूचना जारी करेल. सध्या अल्पकालीन सूचना आणि अर्ज प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Discussion about this post