जळगाव । मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील विविध गावात स्व खर्चातून शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केले होते. या कामामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु हे मुरुमीकरण स्वखर्चातून न करता शासकीय निधीतून केले गेल्याचा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.
रोहिणी खडसे या रावेर तालुक्यातील गहुखेडा गावात शेतकऱ्यांसमवेत एका शेतरस्त्याच्या ठिकाणी गेल्या होत्या तिथे बोलताना त्या म्हणाल्या, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गत काळात स्वखर्चातून मतदारसंघातील शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केल्याचा गाजावाजा केला होता. शेतरस्त्यांची कामे केली गेली याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही परंतु हे कामे स्व खर्चातून केले गेलेले नसून, शासकीय निधीतून केले गेलेले आहे. आमदार स्वखर्चातून शेत रस्त्यांची कामे केल्याचा आव आणत केवळ चमकोगिरी करत आहेत.
विशेष म्हणजे शेतरस्त्यांचे मुरुमीकरण हे जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान केले असून या कामासाठी शासकीय निधीचा वापर केलेला आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३ – २४ या हेड अंतर्गत मार्च २०२३ मध्ये सदर रस्त्यांचे शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीतून बिले काढली गेलेले आहेत. म्हणजे रस्ते करण्याच्या तीन महिने आधीच त्या रस्त्यांसाठी सरकारी तिजोरीतून शासकीय निधी काढला गेलेला आहे. एका एका रस्त्यांसाठी सात ते दहा लाखांची बिले काढली गेली आहेत. प्रत्यक्षात तीन महिन्यानंतर रस्त्यांचे मुरुमीकरण करताना अंदाजपत्रकानुसार काम न करता एक ते दीड लाखांच्या खर्चात रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण कामे केली गेली आहेत.
रस्त्यांची कामे करण्याच्या तीन महिने आधीच शासकीय निधीतून बिले काढण्याचा आणि नंतर निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण काम करण्याच्या या कामात शासकीय यंत्रणेला हाताशी धरून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला गेला असून शेतरस्त्यांचे स्वखर्चातून मुरुमीकरण केल्याच्या भूलथापा देऊन शेतकरी बांधव आणि नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या यादीनुसार मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत २०२३ – २४ मधून खालील रस्त्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे.
१) काकोडा येथे सागर कोल्हे यांच्या शेतापासून गट नं २६३/१/२ पर्यंत रस्ता मुरुमीकरण करणे(६.९९लक्ष), २) नविन निंबोल ते चिंच फाटा शेती रस्ता खडीकरण करणे(७ लक्ष) ३) वाघोदा ते सावरखेडा शिव रस्ता मुरुमीकरण करणे (७ लक्ष), ४) उदळी खु येथे विश्वनाथ चौधरी ते रामचंद्र पाटिल यांच्या शेतापर्यंत मुरुमीकरण करणे (७ लक्ष), ५) वाघोदा ते थोरगव्हाण रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), ६) शेमळदे येथे उचंदे ते मेळसांगवे रस्ता ते जुने शेमळदे रस्ता मुरुमीकरण (१० लक्ष), ७) भामलवाडी ते शिंगाडी शिवरस्ता मुरुमीकरण (७लक्ष), ८) धामणदे बेलखेड शिवरस्ता नलिनी पाटिल यांचे शेताकडील रस्ता मुरुमीकरण (७लक्ष), ९) अंतुर्ली येथे नरेंद्र दुट्टे गट क्र १६५/२ ते २९८ शेतरस्ता मुरुमीकरण करणे(६.९९लक्ष), १०) मानमोडी ते मुंदखेडा तालुका हद्द रस्ता मुरुमीकरण करणे(६.९९लक्ष), ११) धामोडी ते कोळोदा गट नं २०६ कडे जाणार रस्ता मुरुमीकरण (६.९९), १२) धामोडी ते कोळोदा गट नं ७८ कडे जाणार रस्ता मुरुमीकरण (६.९९), १३) चिंचखेडा सिम ते देवधाबा शेत रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), १४) ऐनगाव ते निमखेड रस्ता मुरुमीकरण(७लक्ष), १५) गहुखेडा गाव ते पाट रस्ता मुरुमीकरण( ७ लक्ष), १६) कांडवेल ते जुना चांगदेव रस्ता मुरुमीकरण( ७ लक्ष), १७) वायला ते जुना चिचखेडा रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), १८) निंबोल येथे पाठशाळा ते वसंत बाबुराव यांच्या शेतापर्यंत मुरुमीकरण(७ लक्ष), १९) ऐनपुर ते लोहारी शिवरस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), २०) भोकरी ते नरवेल मुरुमीकरण (7 लक्ष), २१) पुरी गट नं २९ ते गट नं २१८ धामणी रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), २२) गोलवाडे गट नं १९५ ते १५० शेतरस्ता मुरुमीकरण ( ७ लक्ष), २३) गोलवाडे पांडुरंग गंभीर ते बाळू महाजन यांच्या शेतापर्यंत रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), २४) सुलवाडी गाव ते स्मशानभूमी रस्ता मुरुमीकरण ( ७ लक्ष), २५) सुनोदा येथे सुनिल चौधरी ते कौशत पाटिल यांच्या शेतापर्यंत रस्ता मुरुमीकरण ( ७ लक्ष), २६) मेळसांगवे ते खुपखेडा रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), २७) जलचक्र तांडा ते चोर कुऱ्हा रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), २८) कोचुर खु ते प्रजिमा ७२ पर्यंत शेतरस्ता मुरुमीकरण ( ७ लक्ष), २९) सुदगाव गेट ते मांगी चुनवाडे फाटा रस्ता मुरुमीकरण ( ७ लक्ष), ३०) रणगाव शिवरस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), ३१) पळासखेडा बु ते नविन बावडी रस्ता मुरुमीकरण (७ लक्ष ), ३२) चांगदेव येथे लिलाधार चौधरी ते प्रविण पाटिल शेतापर्यंत शेतरस्ता मुरुमीकरण (७ लक्ष), ३३) उचंदा येथे लक्ष्मण पाटिल ते शेषराव कालू पाटिल यांच्या शेतापर्यंत रस्ता मुरुमीकरण (६.९९लक्ष), ३४) धुळे शिवार प्रजिमा ९२ ते ज्ञानेश पाटिल गट नं १३ पर्यंत रस्ता मुरुमीकरण (६.९९लक्ष), ३६) बलवाडी येथे नागदेव शिव रस्ता मुरुमीकरण करणे (७लक्ष), ३७) जुने कुंड ते पूर्णा नदीकडे जाणारा रस्ता मुरुमीकरण (७लक्ष), ३८) उदळी बु येथे दिलीप कोळी ते राजेंद्र पाटिल यांच्या शेतापर्यंत रस्ता मुरुमीकरण (७लक्ष), ३९) उदळी खु शेखर महाजन ते दिनकर पाटिल यांच्या शेतापर्यंत रस्ता मुरुमीकरण करणे( ७ लक्ष) या रस्ता कामांचा समावेश आहे
रस्ते करण्याच्या तिन महिने अगोदर शासकीय निधीतून रस्ता कामांची बिले काढण्याचा आणि नंतर थातुरमातुर रस्ते करण्याचा हा प्रकार शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील म्हणाले.