RITES म्हणजे रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये सध्या भरती सुरु असूनयासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागिवले जात आहे. विविध इंजिनियरिंग पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात येणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे. त्याचसोबत ज्यांनी इंजिनियरिंग केले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rites.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
राइट्समधील या नोकरीसाठी १८ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.
या पदांसाठी भरती
डेप्युटी जनरल मॅनेजर (सिविल-BLT स्पेशलिस्ट) , डेप्युटी जनरल मॅनेजर (परिवहन अर्थशास्त्री), डेप्युटी जनरल मॅनेजर सिव्हिल, सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल प्लानिंग), सहाय्यक व्यवस्थापक (हायड्रोग्राफिक सर्व्हेअर- सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक (रेल्वे अलाइनमेंट डिझाइन), सहाय्यक व्यवस्थापक (GIS स्पेशलिस्ट ) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. आर्क, बी.टेक/बीई, एमए (अर्थशास्त्र, वाहतूक नियोजन), एमई/ एमटेक आणि B.Plan पदवी असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराची वयोमर्यादा ३२ ते ४१ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.
Discussion about this post