जळगाव | महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे यांच्या मार्फत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुरक्षा सेवेसाठी एकूण २० पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये ०१ सुरक्षा पर्यवेक्षक, १५ पुरुष सुरक्षा रक्षक व ०४ महिला सुरक्षा रक्षक यांचा समावेश असून सुरक्षा रक्षक पदासाठी जागा १६ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत.
सुरक्षा पर्यवेक्षक पदासाठी मासिक वेतन रु. २४,९६०.७५/- तर सुरक्षा रक्षक पदासाठी रु. १६,६४०.५०/- देण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी PF, बोनस, ESI, रजा व ग्रॅच्युइटी सुविधा लागू राहतील. कर्तव्याचा कालावधी ०८ तासांचा राहणार आहे.
सर्व माजी सैनिक, त्यांचे पाल्य, वीर नारी तसेच माजी सैनिकांच्या पत्नी यांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह मेस्को पर्यवेक्षक, श्री. श्रीराम मुरलीधर पाटील – मो. ९४०१३०८६९६ / ९४२०६९७८१८, श्री. निंबा सुकदेव मनोरे – मो. ९४२०६९७८१९ / ८१८०९७५९२३ यांच्याशी समक्ष संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांमध्ये १) माजी सैनिक ओळखपत्र, PPO, डिस्चार्ज बुक, २) आधार कार्ड, पॅन कार्ड व स्वतःचे व नामनिर्देशित व्यक्तीचे बँक पासबुक यांचा सामावेश आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post