मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेनं महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेल्या शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना आरबीआयनं रद्द केला आहे. RBI नं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्यानं आरबीआयनं ही पावलं उचलली आहेत.
आरबीआयनं उचललेल्या या पाऊलामुळे बँकेत ठेवी स्विकारण्यास किंवा पैसे घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.या निर्देशांबाबत सविस्तर माहिती देताना सेंट्रल बँकेनं सांगितलं की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसं भांडवल नाही. यासोबतच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचं पालन होत नसल्यानं आणि ग्राहकांचं हित लक्षात घेत आरबीआयनं बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
रिझर्व्ह बँकेनं कोल्हापुरातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केल्यानंतर बँकेत जमा झालेल्या ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सब्सिडियरी आहे, जी 5 लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील.















Discussion about this post