मुंबई । मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनेचा वापर करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचे कारण म्हणजे मतदान केल्यानंतर ज्या बोटावर शाई लावण्यात आली आहे. ती पुसली जात आहे. यामुळे दुबार मतदानाच्या धोक्याची शक्यता बळावत आहे. या प्रश्नाकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. मुंबईतील बालमोहन विद्यालयात मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.
सरकार कशा प्रकारची सिस्टिम चालवत आहे. येणकेण प्रकारे निवडणुका जिंकायच्या सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी सहकुटुंब मुंबईतील बालमोहन विद्यालय येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी ते बोलत होते. मतदान करण्यासाठी मतदारांच्या बोटावर लावण्यात आलेल्या शाईवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, त्याला सॅनिटायझिर लावलं तर ती शाई जाते. ही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन राज यांनी मनसैनिक आणि शिवसैनिकांना केले आहे. तसेच संपूर्ण प्रशानसान हे सत्तेसाठी कामाला लागले असल्याचे मोठं विधानही राज यांनी केले आहे.
या निवडणुकीत व्हिव्हीपॅट नसल्याने दाबलेले बटन कोणाला गेले हे समजत नाही. पूर्वी स्लिप येत होती. आता ती व्यवस्था नाही. त्यामुळे मतदान नक्की कोणाला केले आहे हे समजायला मार्ग नाही. पाडू यंत्र मतमोजणीच्या वेळेला वापरणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. मात्र जे पाडू मशिन आणलं ते कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्याची स्पष्टता देणे गरजेचे असल्याचे मत राज यांनी व्यक्त केले. याबाबत पत्र पाठवून देखील ते आयोग माहिती दिली नसल्याचे देखील राज यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विरोधी पक्ष ठेवायचे नाहीत. दुसऱ्याने निवडणुका लढवायच्या नाहीत. सरकारने ठरवायचे कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे विधानसभेच्या वेळेला केले. ते आता करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले. हे होऊन देणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.















Discussion about this post