जळगाव/मुंबई । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाच्या पट्यामुळे पाऊस सक्रीय आहे. यामुळे राज्यात पाऊस परतला आहे. आज हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यास पावसाचा अलर्ट दिला आहे. गुरुवारी विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही जळगावला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील सोलापूर, नंदुरबार, सांगली जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे. यामुळे शुक्रवारी राज्यभरात दमदार पाऊस असणार आहे.
विदर्भात मुसळधार पाऊस
नागपूर परिसरात मुसळाधार पाऊस सुरु आहे. पुराच्या पाण्यात सहा टन मोसंबी वाहून गेली आहे. काटोल तालुक्यातील लाडगाव परसोडी शिवारात नाल्याच्या पुरात शेतकऱ्याची मोसंबी वाहून गेली आहे. सुभाष नासरे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, रामटेक, बुटीबोरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली. हा पाऊस भात पिकासाठी फायदेशीर आहे. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जळगांव जिल्हा दि22/ 09/2023
बोदवड-40 mm
भुसावळ-2.4
पाचोरा-40
पारोळा-0
जामनेर-10
चोपडा-61
चाळीसगाव-9
रावेर-9
मुक्ताईनगर-29
धरणगाव-35
यावल-64.3
एरंडोल-7
Discussion about this post