मुंबई । राज्यावर ऐन दिवाळी तोंडावर अवकाळी पावसाचं सावट आलं आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविली असून त्यामुळे आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी काही भागात शनिवारीही पाऊस झाला, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
गोवा, केरळ, तामिळनाडूसह देशाची राजधानी दिल्लीमध्येही ऐन दिवाळीत वरुणराजानं हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही भागात शनिवारी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.















Discussion about this post