मुंबई । बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असून या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 3 दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाने पावसाची आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच रायगड, ठाणे, जालना आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.















Discussion about this post