मुंबई । एकीकडे ऑक्टोबर हिटने नागरिक त्रस्त झाले असताना यातच माघारी घेतल्यानंतरही राज्यावर पावसाचं सावट कायम आहे. हवामान खात्यानं पुढील तीन चार दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर आज शुक्रवारी (24 ऑक्टोबर 2025) राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना अलर्ट दिला असून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान विभागाने शुक्रवारी, 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
24 ऑक्टोबर
कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
25 ऑक्टोबर
कोकण – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
26 ऑक्टोबर
कोकण – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Discussion about this post