जळगाव शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला असून, दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पहायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री हलकीसी थंडी जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळेस उकाडा जाणवत आहे. दरम्यान जळगावसह राज्यात आज प्रजासत्ताक दिनी ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात आज ढगाळ हवामान असण्याची शक्यता आहे. ऐन थंडीत पावसाच्या सरी अनुभवयाला मिळू शकतात, त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होऊन थंडी वाढूही शकते. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रावातामुळे राज्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसू शकतो. विदर्भात हवामान निरभ्र राहील तर नागपूरमध्ये सकाळी सौम्य गारवा जाणवू शकतो. मात्र दुपारी तापमान वाढून घामाच्या संरीनी नागरिक चिंब होऊ शकतात.















Discussion about this post