पुणे । गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेय. कोयता, चाकू हल्ला, बलात्कार यासारख्या घटनामुळे कायदा सुव्यवस्था आधीच ढेपाळली होती, त्यात आता एका तरूणाने भरचौकात घृणास्पद कृत्य करत पुण्याची मान शरमेनं खाली घातली आहे.
मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. महिला दिनाच्या दिवशीच भरचौकात धनाड्या बापाच्या पोराने घृणास्पद कारनामा केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला असून अश्लील कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात दारू पिऊन, हातात बियरच्या बॉटल घेत, भर रस्त्यात गाडी लावून, रोड वर लघवी करताना करोडपती वडिलांचे 'सु' पुत्र… pic.twitter.com/KfcRdjRqam
— Saurabh Koratkar (@saurabhkoratkar) March 8, 2025
व्हिडिओत काय?
मद्यधुंद अवस्थेतील तरूणाने शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केले. सिग्नलवरती BMW गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. हे अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओत दिसत आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कृत्यानंतर पुन्हा पुणेकरांची मान शरमेने झुकली आहे.
जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरूणांनी अश्लील कृत्य केलं. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र दिसून येत आहे.
Discussion about this post