अपघाताची एक भीषण घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडलीय. ज्यात बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झालाय. तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज मिर्जापूर हायवेवर मेजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये बोलेरो वाहनातील सर्व दहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत भाविक छत्तीसगडमधील कोरबे येथील असल्याचे समजतेय. बोलेरोमधील सर्व १० भाविक महाकुंभात पवित्र संगम स्नान करण्यासाठी आलेले होते.
बस आणि बोलेरोच्या अपघातामध्ये १९ भाविक जखमी झाले आहेत. जखमी झालेले भाविक हे महाकुंभमेळ्यात संगम स्नान केल्यानंतर वाराणसीला निघाले होते. त्यावेळी मध्यरात्रीच काळाने घाला घातला. बोलेरो आणि बस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. सर्व जखमींना रामनगर सीएचसी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. बसमधील जखमी भाविक मध्य प्रदेशमधील राजगढ येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टुरिस्ट बस आपल्या साइडनेच जात होती. पण समोर अतिशय वेगात आलेलेल्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासातून समोर आलेय. बोलेरोमध्ये असणाऱ्या १० जणांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये चालकाचाही समावेश आहे.















Discussion about this post