साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली. पीएसआय अन् घरमालकाच्या नाव लिहून महिला डॉक्टरने आयुष्य संपविले आहे. बलात्काराचा अन् मानसिक छळ केल्याचा आरोपाने महाराष्ट्र हादरले. दरम्यान डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता. तेथून त्याला अटक केली आहे. तर प्रमुख आरोपी PSI गोपाल बदने अजूनही फरार आहे.
मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसलेल्या प्रशांत बनकर याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पण प्रमुख आरोपी अलेला पीएसआय गोपाल बदने मात्र अद्याप फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी सातारा पोलिसांची चार पथके रवाना झालेली आहेत. PSI बदने फरारच असून त्याचा शोध घेतला जातोय.
दरम्यान, गोपाल बदने यांनी महिला डॉक्टरावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय फलटणमधील विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही चार महिने मानसिक छळ केल्याचे महिला डॉक्टराने आत्महत्या करण्याआधी लिहिले.















Discussion about this post