सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.भारतीय डाक विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांना indiapost.gov.in या साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल.
उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून चालणार नाहीये. अर्जाची हार्ड कॉपी देखील सबमिट करावी लागणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत ही हार्ड कॉपी सबमिट करावी लागेल. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारे सुवर्णसंधीच आहे.
या भरती प्रक्रियेव्दारे भारतीय डाक विभागामध्ये 78 जागा भरल्या जाणार आहेत. 78 ड्राइवर (साधारण ग्रेड) या पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची परीक्षा ही घेतली जाईल.
मान्यता प्राप्त बोर्डातून उमेदवार हा दहावी पास असायला हवा. उमेदवारांना हार्ड कॉपी कागदपत्रांसह व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश या पत्त्यावर फक्त पोस्टाने पाठवावे लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा.















Discussion about this post