मुंबई । एकीकडे वीज वितरण कंपनी महावितरणकडून वीज दर कपातीसाठी प्रस्ताव दिला गेला आहे, मात्र दुसरीकडे महावितरणने प्रत्यक्षात स्थिर आकार 12 ते 15 टक्क्यांनी वाढविला आहे. व्हेरिएबल चार्जमध्ये वाढ केली नसल्याचे सांगत, महावितरणने स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र, दोन्हीपैकी एक दर जरी वाढले तरी वाढीव वीज बिलाचे पैसे ग्राहकांनाच भरावे लागणार आहेत.
100 युनिटपर्यंत वापर असणाऱ्यांना दिलासा :
महावितरणसोबतच बेस्ट अदानी आणि टाटा पॉवरच्या घरगुती वीज ग्राहकांचे एप्रिल महिन्याचे वीज बिल 5 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सौर ऊर्जेचा वापर :
दिवसा सौर ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे. सौर ऊर्जेपासून दिवसाला 16 हजार मेगावॅट वीज तयार केली जाणार आहे. मात्र, प्रकल्प उभे राहण्यास दोन वर्षे लागतील. त्यामुळे उर्वरित काळात कोळशावर आधारित वीज वापरावी लागेल, यासाठी कोळशावरचे प्रकल्प नियमित सुरू ठेवावे लागतील. मार्च महिन्यात ६०० युनिटसाठी अंदाजे बिल २,००० रुपये आहे, तर एप्रिलमध्ये ते २,३०० रुपये होऊ शकते.
मंगळवारी, २५ फेब्रुवारीला नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये महावितरणच्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र हे दर लागू होण्यापूर्वी वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दरवाढीबाबत विश्लेषण केले आहे.
Discussion about this post