जळगाव : विधान परिषदेचा सदस्य आहे. त्यामुळे हे सदस्यत्व असताना निवडणूक लढणे योग्य होणार नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे, कि विधानसभेची निवडणूक लढणार नाही. तसेच खासदारकी परिवारामध्ये असल्यामुळे मी खासदारकीची पण निवडणूक लढणार नाही. मुख्य म्हणजे मी राजकीय संन्यास मरेपर्यंत घेणार नसल्याचे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले आहे.
लोकसभेसाठी जळगाव व रावेर मतदार संघात उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता पडू शकते; अशी बातमी व्हायरल होत आहे. यावर बोलताना खडसे यांनी सांगितले कि, नरेंद्र मोदींची आजची स्थिती ४०५ अशी आहे; यामुळे नरेंद्र मोदी यांना सध्या तरी कुणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. एवढे बहुमत त्यांना या निवडणुकीत मिळेल; असे खडसे यांनी स्पष्ट केले.
लवकरच भाजप प्रवेश
एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेश लांबला आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि भाजप प्रवेशाबाबत कुणाची नाराजी वगैरे नाही. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर तातडीने भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post