पुणे | राजकारणात कधी काय होईल याचं नेम नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं होते. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले असून या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई आता निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या समोर आणि सुप्रीम कोर्टातही सुरु आहे.
असं असताना आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या आहेत. या घडामोडी पाहता ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटणार तर नाहीत ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी मोठ्या हालचाली घडल्या. त्याआधी आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट घडून आली. त्यानंतर दुपारी प्रतापरावर पवार यांच्या घरी दोन्ही गटाच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. या भेटीनंतर आता आणखी पुढे काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण अजित पवार पुण्यातहून थेट दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत.
या सर्व घडामोडींना प्रत्यक्षपणे आणि उघडपणे आज सकाळी सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. पण दोन मोठे नेते एकत्र येणार आणि राजकीय चर्चा होणार नाही, असं शक्यच नाही. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज दुपारी पुण्यात बाणेरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांचं बाणेरमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील अनेकजण आले होते.















Discussion about this post