जळगाव । गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यात नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती ८ हजार लाचेची घेतांना जळगाव जिल्हयातील पारोळा येथील पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
अंचाळे, ता.धुळे येथील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात गुन्हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने पाठवण्यासाठी सुरूवातीला लाचखोर फौजदाराने 30 हजारांची मागणी केल्यानंतर सुरूवातीला 20 हजार रुपये स्वीकारले मात्र त्यानंतर लाचेची हाव थांबली नाही व पुन्हा उर्वरीत 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आठ हजार रुपये देण्याचे ठरले व तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताच जयवंत पाटील यास अटक करण्यात आली.















Discussion about this post