पाटबंधारे प्रकल्प मंडळाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली असून यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या पदांसाठी होणार भरती?
यामध्ये सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-२, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय अभियंता पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठीचे ठिकाणी बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ हे आहे.
या नोकरीसाठीची अधिकृत जाहीरात आणि अर्जाची माहिती तुम्हाला http://wrd.maharashtra.gov.in येथे मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. तुम्हाला अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ. जिल्हा परळी येथे पाठवायचा आहे.
पाटबंधारे विभागातील ही भरती राज्य श्रेणीअंतर्गत होणार आहे. या नोकरीसाठी रिटायर्ड इंजिनियर अर्ज करु शकतात. याचसोबत वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगवेघळी आहे. त्यामुळे इच्छुकांनी जाहिरात पाहूनच अर्ज करावेत.या नोकरीसाठी वेतन पदानुसार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत.
सरकारी विभागात काम करायची संधी तुम्हाला मिळणार आहे. ही भरती बीड येथे होणार आहे. त्यामुळे बीडमधील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. तुम्हाला सरकारी विभागात काम करायचा अनुभव आणि चांगले वेतनदेखील मिळणार आहे.
Discussion about this post