नवी दिल्ली | रेल्वेचा प्रवास हा केवळ प्रवासच नव्हे तर आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो. याच दरम्यानं एका ट्रेनमधील दोन कोचमधील वीजच गेली. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी चक्क टीटीईला टॉयलेटमध्येच कोंडले.
दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर पर्यंत जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेनुसार आनंद विहार येथून रवाना झाली. मात्र ट्रेन पुढे गेली असता थोड्याच वेळात ट्रेनमधील दोन कोचमधील वीजच गेली.
https://twitter.com/PTI_News/status/1690077470605901824
पॉवर फेल्युअर झाल्यामुळे AC सुद्धा बंद पडला आणि उकाड्यामुळे लोकांची चिडचिड, राग आणखीनच वाढला. वाढत्या उकाड्यामुळे कोचमधील लहान मुलं आणि महिलांचा त्रास वाढला. B1 और B2 कोचमधील प्रवासी गरमीमुळे चिडले होते, तेवढ्यात त्यांना ट्रेनचा तिकीट चेकर (TTE) दिसला. मग काय, प्रवाशांनी त्याला सरळ धारेवर धरलं , सगळा राग त्याच्यावरच निघाला. पॉवर कटमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी तिकीट चेकरला सरळ टॉयलेटमध्येच कोंडले
हे प्रकरण वाढताच रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा हा प्रकार वाढत गेल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत रेल्वेच्या दोन डब्यातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्त करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली.
Discussion about this post