पारोळा | पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वीजखेडे गावानजिक ट्रक आणि दोन पिकअप वाहनांच्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. तर 22 जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज घडली.
रस्त्यावर जखमींच्या रक्ताचा अक्षरश: सडा पडला अतिशय चित्तथरारक अशी ही घटना होती. रेखाबाई गणेश कोळी (वय 55), योगिता रविंद्र पाटील (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंदनबाई नाना गिरासे (वय 50) या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेलं जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तीनही महिला या पारोळा तालुक्यातील बोळे गावाच्या राहिवासी आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
पारोळ्याकडून धुळेकडे जाणाऱ्या कंटेनरवरील (क्रमांक GJ -12-BW -7254) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने अंत्यसंस्कारासाठी शिंदखेडाकडे जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. तसेच कंटेनरने दुसऱ्या आणखी एका नव्या पासिंगसाठी जाणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या वाहनातील दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एका महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. या अपघातात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप
या घटनेमुळे पारोळा येथील कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते. संबंधित अपघाताचे वृत्त कळताच बोळे गावासह परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.22 जण गंभीर जखमी झालेत यातील तिघांना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे पारोळा येथील कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप आले होते. सदर अपघाताचे वृत्त कळताच बोळे गावासह परिसरातून शेकडो नागरिकांनी अपघात स्थळी तसेच कुटीर रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली होती.















Discussion about this post