नवी दिल्ली । लहान मुलांना सर्दी आणि खोकला झाल्यानंतर पाजण्यात आलेला कफ सिरप तब्बल 11 मुलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे वाहनांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन या कफ सिरपमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण अकरा लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एकूण 9 मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर राजस्थानमधील भरतपूर आणि सीकर येथे प्रत्येक एका मुल या कफ सिरपचे सेवन केल्याने दगावले आहे. बनावट कफ सिरपमुळे आमच्या मुलांचा मृत्यू झाला आहे, असा गंभीर आरोप मृत मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना घडल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून कफ सिरप तयार करणाऱ्या कंपन्यांनी बनावट कफ सिरप तयार केल्याचे समोर आहे. धक्कादायक म्हणजे वाहनांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन या कफ सिरपमध्ये वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रातर्फे कफ सिरप जमा करण्यात आले आहेत. हे कफ सिरप तयार करताना एक तर गुणवत्तेची चाचणी केलेली नाही. तसेच कच्चा माल कोणता होता, याचीही कोणती नोंद ठेवण्यात आलेली नाही, हे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे कफ सिरपच्या लेबलिंगमध्येही गडबड असल्याचे समोर आले आहे.
लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राजस्थान सरकारने मुख्यमंत्री मोफत औषध वाटप योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप थांबवले आहे. तर मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे दोन ब्रँडच्या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे, त्या एकूण 23 कफ सिरपच्या सॅम्पलचा अभ्यास करण्यात आला. यातील तीन कफ सिरपमध्ये डायइथीलन गायकॉल (डीईजी) तसेच एथिलीन ग्लायकॉल (आजी) हे घटक असल्याचे समोर आले आहे. हे घटक वाहनांमध्ये कुलंट तसेच ब्रेक फ्ल्यूड म्हणून वापरले जाते.















Discussion about this post