धरणगाव । तालुक्यातील पाळधी येथे दोन गटात हाणामारी झाल्याने १० पेक्षा जास्त जण जखमी झाले. यातील ९ जणांना जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता; पण आता परिस्थती नियंत्रणात आहे.
पाळधी बुद्रुक येथील कोळी वाड्यात शुक्रवारी रात्री साळुंखे व सपकाळे या दोन गटात पूर्वीच्या वादातून वादाला सुरुवात झाली. ही हाणामारी धूमसचक्रीपर्यंत पोहचली. दोन्ही गटातील २० ते २५ जण एकमेकांवर लाठया-काठया, दगड व शस्त्र घेऊन चालून गेलेत. तब्बल अर्धापाऊन तास हाणामारी सुरू होती. यात १५ ते २० जण जखमी झाले. त्यांना तातडीने पाळधी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काहींना प्रथम उपचार नंतर घरी सोडून देण्यात आले तर काहींना जळगावातील खासगी रुग्णालयात व जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाळधी येथे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आऊट पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीतील जुन्या वादातून शुक्रवारी पुन्हा वाद उदभवून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. जीएमसीत दाखल असलेल्या जखमींमध्ये कमलेश प्रकाश कोळी, गणेश पुंडलिक कोळी, कल्पेश नरेंद्र कोळी, प्रकाश झिपरू कोळी, बळीराम भागवत साळुंखे, नीलेश श्रीकृष्ण साळुंखे (इतरांची नावे माहित नाही) आदींचा समावेश असल्याचे समोर आले.















Discussion about this post