पहूर । जामनेर तालुक्यातील पहुरपेठ येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या पराभव झाल्याचा राग आल्याने एकावर ट्रॅक्टर नेऊन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहुरपेठ येथे रामेश्वर बाबुराव पाटील (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान नुकतेच पहूरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात त्रस्त व्यक्तीचा पराभव झाला होता. याचा राग आल्याने त्रयस्त व्यक्तीने आरोपी मोहसीन खान नवाब खान रा. मालेगाव जि. जळगाव याला सांगून जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मोहसीन खान याने (एमएच १८ बीजी ४१४२) हे रामेश्वर बाबुराव पाटील यांच्या अंगावर नेला.
दरम्यान सोबत असलेल्या काही जणांनी त्याला ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपी मोहसीन खान नवाब खान याने न जुमानता समोर असलेल्या दुचाकीवर नेवून नुकसान केले आहे. दरम्यान याप्रकरणी रामेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहसीन खान नवाब खान यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप करीत आहे.















Discussion about this post