जळगाव : पाचोरा येथील बस स्थानक परिसरामध्ये मोटरसायकल आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केलं त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून अज्ञात आरोपी मोटरसायकल वरून घटनास्थळावरून पसार झाले आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरात असलेल्या बस स्थानक परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी आकाश कैलास मोरे तरुणावर गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले आहेत.या गोळीबाराच्या घटनेने पाचोरा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत आकाश मोरे यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर पाचोरा पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके रवाना केली आहेत. शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post