जळगाव । येथील गीत झंकार आणि मेलडी सुपरहिट ऑर्केस्ट्रातर्फे “कौन बनेगा खानदेश आयडल” या स्पर्धेचे आयोजन दिनांक 29 सप्टेंबर रोजी गंधे हॉल, ला.ना. हायस्कूल येथे करण्यात आले आहे.
गीत झंकार आणि मेलडी सुपरहिट ऑर्केस्ट्रातर्फे दरवर्षी जळगाव फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत यावर्षी गीत गायन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. एकल गायन प्रकारात खुला गट असून नृत्य प्रकारात सोलो नृत्य फक्त 12 वर्षातील मुला- मुलींसाठी आहे. गीत गायन प्रकार हा कराओके संगीतद्वारे होणार आहे. दोन्ही प्रकारातील विजेत्यांना जळगाव आयडल ट्रॉफी, प्रथम, द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी मोहन तायडे, 174, विसनजी नगर, जळगाव किंवा 9860303888 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
“भूले बिसरे गीत” कार्यक्रम
स्पर्धा संपल्यावर गीत झंकार संस्थेतर्फे “भूले बिसरे गीत” हा निवडक जुन्या गीतांचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता गंधे हॉल येथे होणार आहे. तरी इच्छुकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व सायंकाळी होणाऱ्या “भूले बिसरे गीत” कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कोसोदे, सचिव कांचनकुमार तायडे, कार्याध्यक्ष मोहन तायडे यांनी केले आहे.
Discussion about this post